उत्तम मराठी ब्लॉग कसा लिहितात? How to write blog in Marathi?

ब्लॉग म्हणजे काय? Blog meaning in Marathi

Blog meaning in Marathi, How to write blog in Marathi। डिजिटल माध्यमाचा वापर सुरु केल्यानंतर, नेट वर थोडे सेट झाल्यानंतर साधे सरळ प्रश्न प्रत्येकाला पडतात. त्यापैकी एक प्रश्न म्हणजे ब्लॉग काय असतो? कसा लिहिला जातो? ब्लॉग म्हणजे साध्या सोप्या भाषेत “लेख”. एखाद्या विषयावर सविस्तर आणि मुद्देसूद मांडणी केलेला लेख म्हणजेच ब्लॉग, तसेच जवळपास ३०० शब्द असलेला वाचण्यास सोपा आणि माहितीपुर्ण लेख.

Blogger

Blogger या प्लॅटफॉर्म वर अगदी मोफत ब्लॉग सुरु करता येतो. या आधी Blogger हे स्वायत्त platform होते, त्यानंतर ते गुगल ने विकत घेतले. आता Blogger चा पर्याय गुगल च्या टूल्स मध्ये येतो. यात आपल्या वयक्तिक (personal blog) नावाने अथवा एका विशिष्ठ नावाने blog सुरु करू शकता. Blogger मध्ये आपले अकाउंट बनवताना उपलब्ध नाव तपासू शकता. उदाहरणार्थ आपल्याला abc असे नाव हवे आहे, याची उपलब्धतता असेल तर आपला blog url हा पुढील प्रमाणे असेल “abc.blogspot.com”.

ब्लॉग कसा लिहितात? How to write blog in Marathi?

आपण कुठल्याही विषयावरती ब्लॉग लिहू शकता. त्यासाठी कुठल्या प्रशिक्षणाची गरज नाही. अगदीच सुरुवात असेल तर तुम्हाला ज्ञात असलेल्या विषयाबद्दल लिहू शकता. जेणेकरून तुम्हाला थोडा सराव होईल आणि त्यानंतर  इतर विषयांमध्ये जाऊ शकता. काही महत्वाचे मुद्दे आहेत जे ब्लॉग लिहिताना लक्षात घ्यावयाचे असतात. ब्लॉग शीर्षक, मुख्य परिच्छेद, प्रतिमा, निष्कर्ष.

ब्लॉग शीर्षक (Title)

कुठलाही लेख हा त्याच्या शीर्षकामुळे वाचकाला वाचावासा वाटतो, शीर्षक प्रभावी नसेल तर ब्लॉग ला जास्त प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे ठळक आणि वैशिष्ट्यपूर्ण असे शीर्षक महत्वाचे ठरते. ब्लॉग चा विषय आणि शीर्षक याचा जास्तीत जास्त संबंध असावा, कारण वाचक हे आधी आपले शीर्षक आणि विषय कुठला ते पाहतील आणि नंतर ब्लॉग कडे आकर्षित होतील.

How to write blog in Marathi
blog meaning in marathi

मुख्य परिच्छेद (Paragraph)  

ब्लॉग शीर्षकानंतर मुख परिच्छेद येतो. या मध्ये आपण मुद्द्यांचा वापर करू शकता किंवा  तीन ते चार परिच्छेद लिहू शकता. मुद्दे लिहिताना मुद्दा आणि त्याखाली परिच्छेद लिहावा, जेणेकरून वाचन करण्यास सोपे जाते. याशिवाय व्याकरण आणि शब्दरचना तपासून घ्या. इंटरनेट वरती असंख्य साईट्स आहेत ज्यांचा आपल्याला व्याकरण आणि शब्दरचना तपासण्यास मदत होईल.

How to write blog in Marathi
How to write blog in Marathi

प्रतिमा (Images)

या शिवाय आपल्या Blog ला शोभा येणार नाही. कोणालाही फक्त मोठे परिच्छेद वाचायला आवडणार नाहीत, त्यामध्ये आपण प्रतिमा (इमेजेस) लावल्या तर अधिक सोयीस्कर पडेल. वाचणाऱ्यास सोपे जाईल आणि पाहायला पण व्यवस्थित वाटेल. Pexels, Photolia या सारख्या साईट्स जेथे आपल्याला मोफत प्रतिमा मिळतील. याचा वापर आपण ब्लॉग मध्ये करून अधिक आकर्षक बनवू शकता. 

हेही वाचा : Keywords म्हणजे काय? SEO साठी काय महत्वाचे असते?

निष्कर्ष (Conclusion)

सर्वात शेवटी आपण लिहिलेल्या ब्लॉग चे तात्पर्य (Conclusion) लिहिणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण काही वाचक हे सर्व लेख न वाचता आधी शेवटी काय आहे ते पाहतात आणि नंतर ठरवतात वाचायचा अथवा नाही. जर आधी निष्कर्ष वाचला तर परत पहिल्या शब्दापासून वाचण्याची शक्यता जास्त होते.

या सोबतच Google Search Console , Search Engine Optimization हे देखील महत्वाचे आहे कारण फक्त ब्लॉग लिहिला की लगेच गुगल वरती येत नाही. त्यासाठी वेबसाईट रँकिंग महत्वाची ठरते. गुगल टूल्स च्या मदतीने आपण रँकिंग करू शकता.


वरील लेखाबद्दल आपल्या प्रतिक्रिया खाली दिलेल्या संपर्क कक्षा मध्ये नोंदवू शकता.

 

किवर्ड म्हणजे काय? Keywords meaning in Marathi?

घरबसल्या ऑनलाईन पैसे कमावण्याचे मार्ग

Leave a Comment