ईडी म्हणजे काय? ईडी चे कामकाज, ED meaning in Marathi

शेअर करा

What is ED meaning in Marathi?

ईडी म्हणजे काय? असा प्रश्न सर्वाना पडतो. अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) म्हणजेच ईडी, हिंदी मध्ये प्रवर्तन निदेशालय असे संबोधले जाते. आर्थिक घोटाळे अथवा पैशांचा गैरव्यवहार यांचा तपास करणे हे ईडी चे मुख्य काम आहे. केंद्र सरकार मधील महसूल विभाग आणि अर्थ मंत्रालय यांच्या अंतर्गत ईडी (Enforcement Directorate) चे कामकाज चालते. ईडी ची स्थापना १९५६ मध्ये दिल्ली येथे झाली आहे.

ईडी म्हणजे काय? सविस्तर.. 

स्थापना उद्देश

ईडी चा मुख्य उद्देश म्हणजे पुढील दोन कायद्याची अंमलबजावणी करणे. 

१. फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट,१९९९ (FEMA) 

२. प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉंडरिंग ऍक्ट, २००२.(PMLA) 

जर या कायद्यांचे उल्लंघन होत असेल तर त्या प्रकरणात ईडी द्वारे तपास केला जातो, म्हणजेच ईडी ही मुख्य तपास यंत्रणा ठरते. ईडी ला तपास करणे, अटक करणे, खटला दाखल करणे, मालमत्ता जप्त करणे असे विविध अधिकार दिले गेले आहेत. आर्थिक गुन्हे रोखण्यासाठी साठी ईडी कडून सक्त कार्यवाही केली जाते. बेहिशेबी मालमत्ता, कर चुकवणे आर्थिक घोटाळा इत्यादी तपास ईडी द्वारे केला जातो

अधिकारी नेमणूक 

पूर्वी ED मध्ये कार्यरत असणारे अधिकारी रिझर्व्ह बँकेमार्फत नेमले जायचे. ईडी महसूल विभाग अंतर्गत आल्यापासून कस्टम, प्राप्तिकर विभाग, पोलीस, सेंट्रल एक्साईज अशा संस्थेमधून अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते. यातील सर्व अधिकारी शिस्तप्रिय आणि निर्भीड असतात, तसेच त्यांच्यावर कुठल्याही दबावाचा परिणाम होत नाही.

कार्यालये 

ईडी चे मुख्यकार्यालय दिल्ली येथे आहे. तसेच विभागीय / उपविभागीय  कार्यालये संपूर्ण भारतात आहेत. चेन्नई, मुंबई, चंदीगड, कलकत्ता, दिल्ली येथे विशेष संचालक द्वारा कार्य चालते. त्याच प्रमाणे देशभरात असणाऱ्या विविध  कार्यालयाची संख्या एकूण ४९ इतकी आहे. 

ED Meaning in Marathi
ED meaning in Marathi

ईडीची भीती

अनेक बड्या उद्योगपतींचे आर्थिक घोटाळे ईडी ने बाहेर काढली आहेत आणि कार्यवाही देखील केली आहे. यामध्ये मोठे आर्थिक गैरव्यवहार, बेहिशेबी मालमत्ता, कर चुकवणे अशी प्रकरणे आहेत. यातील काही उद्योगपतींनी ईडी च्या भीतीने देश सोडून पळ काढला आहे. कितीही दिग्गज माणूस असला तरी तो ईडी च्या कार्यवाही पासून वाचू शकत नाही.

हेही वाचा :

विरोधकांचे आरोप 

सत्ताधारी पक्षाच्या सांगण्यावरून ED काम करते असा आरोप विरोधी पक्षाकडून होत असतात. मात्र ईडी ही  स्वायत्त संस्था आहे आणि तिला विशेष अधिकार प्राप्त आहेत. त्यामुळे कोणाच्या सांगण्यावरून नव्हे तर पुराव्यानिशी तक्रार केल्यानंतर ED कडून तपास सुरु केला जातो. मात्र यामध्ये फक्त विरोधी पक्षात असणाऱ्या लोकांवर कार्यवाही होते असे आरोप केले जातात, त्यात कितपत तथ्य आहे हे सांगता येणार नाही. राजकीय आरोप सोडले तर या प्रकारची  कुठलीच कायदेशीर तक्रार देखील दाखल झालेली नाही.

यांच्यावर कार्यवाही

काँग्रेस चे नेते पी चिदंबरम, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, छगन भुजबळ यांचे पुत्र समीर भुजबळ, रॉबर्ट वाड्रा या सर्वांची विविध प्रकरणात ईडी द्वारे चौकशी झाली आहे. तसेच राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार याना देखील नोटीस देण्यात आली होती. शिवसेनेचे नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर देखील ED ने छापा टाकला आहे. तसेच घोटाळेबाज विजय मल्ल्या आणि निरव मोदी हे उद्योगपती ईडी च्या भीतीने इतर देशात पळून गेले आहेत. (ED Meaning in Marathi).


वरील लेखाबद्दल आपल्या प्रतिक्रिया खाली दिलेल्या चौकटी मध्ये नोंदवू शकता.

अलीकडील लेख

 • EPFO UAN KYC अपडेट करण्याची प्रक्रिया
  PF खात्यातून रक्कम काढण्यासाठी UAN मध्ये सर्व माहिती अपडेट करणे बंधनकारक आहे. माहिती अपडेट केली नसेल तर आपल्याला पीएफ रक्कम काढता येणार नाही. यामध्ये KYC म्हणजेच महत्वाची कागदपत्रे आणि त्यातील माहिती EPFO खात्याशी जोडणे. आधार, पॅन आणि बँक खाते हे कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने KYC प्रक्रिया पूर्ण करता येते. KYC अपडेट करण्याची … Read more
 • UAN क्रमांक ऍक्टिव्ह करण्याची प्रक्रिया. UAN Activation Process in Marathi.
  UAN क्रमांक ऍक्टिव्ह करण्याची प्रक्रिया. UAN Activation Process पीएफ रक्कम काढण्यासाठी महत्वाची बाब म्हणजे UAN क्रमांक ऍक्टिव्ह असणे. UAN ऍक्टिव्ह करण्याआधी आपला UAN क्रमांक माहिती हवा. संस्थेतील संबंधित वरिष्ठांना विचारून तो माहित करून घेता येतो. त्याच प्रमाणे EPFO वेबसाईट वरून देखील UAN क्रमांक मिळवता येतो. त्यासाठी आपला मोबाईल क्रमांक आणि त्यावर येणारा OTP टाकून UAN … Read more
 • ई-बुक म्हणजे काय?
  वाचन म्हणजे एक असा छंद जो एकाग्रता आणि ज्ञान डोही गोष्टीसाठी फायद्याचा ठरतो. पुस्तकं वाचन केल्याने एकाग्रता वाढते तसेच वाचणामुळे आपल्याला ज्ञान देखील प्राप्त होते. पूर्वी ग्रंथाल्यामध्ये जाऊन पुस्तकं आणून वाचन झाले की परत द्यायचे. मात्र आत्ता फारशी ग्रंथालय नाहीत. याला कारण म्हणजे तंत्रज्ञानाची प्रगती. आता एका क्लिक वर पुस्तकं मागवता येतात किंवा ई-बुक डाउनलोड … Read more
 • म्युटेशन म्हणजे काय? Meaning of Mutation in Marathi.
  कोरोनासारखा गंभीर आजार जगाला सतावत आहे. सर्व जगातील शास्त्रज्ञ कोरोनावरील लस शोधण्यात अथक परिश्रम घेत आहेत. काही लसी निर्माण सुद्धा करण्यात आल्या आणि अत्यावश्यक वापरासाठी परवानगी देखील देण्यात आली. कोरोना व्हायरस हा कुठून आला, कुठल्या देशात उद्भवला अथवा इतर अनेक प्रश्न उपस्थित होत असताना अजून एक नवीन आव्हान उभे राहिले आहे ते म्हणजे “म्युटेशन”. ज्याप्रकारे … Read more

Leave a Comment

error: Content is protected !!