भारतीय निवडणूक आयोग माहिती मराठी

भारतीय निवडणूक आयोग माहिती मराठी :

लोकशाही मध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या संस्थांपैकी एक संस्था म्हणजे भारतीय निवडणूक आयोग (Election Commission of India). लोकशाही मूल्यांचे पालन करून आणि स्वतंत्रपणे निवडणूक व्यवस्थापन करणे  हे या संस्थेचे मुख्य काम आहे. देशपातळीवरील अथवा राज्य पातळीवरील निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडणे, कोणताही अनुचित प्रकार होत असेल तर त्याला आला घालणे अशा अनेक जबाबदाऱ्या निवडणूक आयोगाकडे असतात. भारतीय निवडणूक आयोग माहिती मराठी मराठी मधून ….

1. स्थापना 

२५ जानेवारी १९५० रोजी भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना केली गेली. राजकीय पक्ष नोंदणी, निवडणूक चिन्ह, पक्ष देणग्या हिशोब, निवडणूक जाहीर करणे आणि संबंधित विविध काम भारतीय निवडणूक आयोगाद्वारे केले जातात. भारतीय राज्यघटनेमध्ये निवडणूक आयोग संबंधित तरतुदी दिल्या आहेत (३२४ ते ३२९क). निवडणूक आयोग स्थापना दिवस हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो.

2. आयुक्त नेमणूक

भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य कार्यालय दिल्ली येथे आहे, मुख्यालयाचे प्रमुख म्हणजेच आयोगाचे मुख्य आयुक्त असतात. राष्ट्रपती हे मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक करतात तसेच सहाय्यक आयुक्तांची नेमणूक केली जाते. भारतातील सर्वोच संस्था म्हणून निवडणूक आयोगाची गणना केली जाते. यामुळे निवडणूक आयुक्त पद हे न्यायमूर्ती पद प्रमाणे असते.

निवडणूक आयोगाचे आयुक्त यांचा कार्यकाळ ६ वर्ष अथवा वयवर्षे ६५ जे आधी पूर्ण होईल ते ग्राह्य धरले जाते. कार्यकाळ संपण्याआधी पदमुक्त व्हायचे असेल तर, राष्ट्रपती यांच्या कडे राजीनामा सुपूर्द करण्यात येतो. तसेच कायदयानुसार राष्ट्रपती हे आयुक्तांना पदमुक्त करू शकतात (अपवादात्मक परिस्थिती मध्ये). 

3. राज्य निवडणूक आयोग 

महाराष्ट्र निवडणूक आयोगाची स्थापना २६ एप्रिल १९९४ मध्ये करण्यात आली. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हापरिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपालिका, नगर पंचायत  यांच्या निवडणूक घेण्याची संविधानिक जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाकडे आहे. 

केंद्रीय निवडणूक आयोग मुख्य आयुक्त द्वारे नियंत्रित केला जातो तसे राज्यात मुख्य निवडणूक अधिकारी द्वारे निवडणूक नियंत्रित केल्या जातात. मुख्य निवडणूक अधिकारी याना जिल्हाधिकारी, तहसीलदार निवडणूक प्रक्रियेमध्ये मदत करतात.

4. यंत्रणा 

निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्यात आल्यानंतर निवडणूक व्यवस्थापन करण्यासाठी एक यंत्रणा उभी केली जाते. राज्य निवडणूक आयोगाद्वारे यंत्रणा आखली जाते. या मध्ये शासकीय सेवेमध्ये असणारे कर्मचारी आणि अधिकारी नेमले जातात. अनुभव आणि पदाच्या दर्जाप्रमाणे काम सोपवण्यात येते. निवडणूक संपल्यानंतर सर्व कर्मचारी पूर्वपदावर काम करण्यास जातात.

राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोग या दोन्ही यंत्रणा लोकशाही साठी अत्यंत महत्वाच्या आहेत. कोणत्याही दबावाशिवाय आणि स्वायत्तपणे कार्य करणे हि मोठी जबाबदारी यांच्यावर असते. निवडणूक प्रक्रियेमध्ये अनुचित प्रकार घडू न देणे, मतदान केंद्रावर लक्ष ठेवणे, कायद्यानुसार कार्यवाही करणे  या बाबी महत्वाच्या असतात. (भारतीय निवडणूक आयोग माहिती मराठी)


अलीकडील लेख :

 • “निवडणूक आचारसंहिता” माहिती
  निवडणूक आचारसंहिता निवडणूक जाहीर केलेल्या तारखेपासून ते शेवटचा निकाल लागेपर्यंत आचारसंहिता लागू असते. निवडणूक आयोग याबाबत पत्रक प्रसारित करतो. निवडणूक अर्ज विषयक तारखा, अटी, पात्रता, तारीख, अनामत रक्कम आणि संबंधित सर्व माहिती व नियम जाहीर केले जातात.  घटनेच्या ३२४ या कलमानुसार निवडणूक आयोगाला काही अधिकार दिले गेले आहेत. यानुसार निवडणूक आयोगाला उमेदवार, पक्ष आणि संबंधित … Read more
 • ब्लॉगिंग Niche म्हणजे काय? Niche meaning in Marathi.
  Niche meaning in Marathi: ब्लॉगिंग Niche म्हणजे काय?  ब्लॉगिंग, अफिलिएट मार्केटिंग, ईकॉमर्स वेबसाईट, युट्युब आणि ऑनलाईन पैसे कमवण्याचे मार्ग ह्या गोष्टींकडे कल वाढत आहे. काही वर्षांपूर्वी घरबसल्या ऑनलाईन पैसे कमवता येतात यावर कोणाचा विश्वास बसत नव्हता. मात्र अलीकडे तंत्रज्ञान युगात झालेली क्रांती आणि इंटरनेटचा वाढता वापर पाहता हे सहज शक्य होत आहे. शेअर ट्रेडिंग सारख्या … Read more
 • महाराष्ट्रातील राजकीय पक्ष संक्षिप्त माहिती. Political Parties in Maharashtra
  Political Parties in Maharashtra राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष अशा दोन मुख्य प्रकारात पक्ष वर्गवारी करण्यात आलेली आहे. राज्य पातळीवर काम करणारे पक्ष हे प्रादेशिक पक्ष म्हणून संबोधले जातात आणि देश पातळीवर काम करणारे पक्ष हे राष्ट्रीय पक्ष म्हणून संबोधले जातात. पक्ष संघटना कार्यक्षेत्र, राज्य, प्रदेश अशा अनेक बाबी नुसार पक्षांची नोंदणी होते. भारतीय निवडणूक … Read more
 • फेसबुक खाते बंद कसे करावे?
  सर्वात आधी आपल्याला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक वर लॉगिन करावे लागेल. आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करा. जर आपला पासवर्ड अथवा आयडी विसरला असेल तर आधी रीसेट करून घ्यावा लागेल. त्यासाठी लॉगिन करताना forgot password/username या पर्यायावर क्लीक करा. ई-मेल अथवा फोन निवडा, त्यावर आणलेला कोड टाका. नवीन पासवर्ड टाका आणि सबमिट करा. लॉगिन केल्यानंतर … Read more
 • सी एस आर निधी बद्दल माहिती मराठीत. CSR Information in Marathi.
  CSR Information in Marathi : सामाजिक जबाबदारी सामाजिक जबाबदारी म्हणजे समाजाप्रती असलेली जबाबदारी. आपण समाजाला काहीतरी देणं लागतो आणि त्यासाठी समाजाला फायदा होईल असे कार्य केले पाहिजे. या कार्यामध्ये विविध गोष्टी केल्या जाऊ शकतात, जसे गरीब मुला-मुलींसाठी शिक्षण उपलब्ध करणे, पाणी, रस्ते, कपडे आणि अन्य बाबी. सामान्य वक्ती साठी सामाजिक जबाबदारी असते तसेच कॉर्पोरेट कंपन्यांसाठी … Read more

Leave a Comment